कामशेतमध्ये महर्षी कर्वे आश्रमशाळेतील नूतन बहुउद्देशीय सभागृह व भोजन कक्ष उद्घाटन समारंभ संपन्न.
कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये आज शनिवार दिनांक 4/7/ 2026 रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय जनजाती हितरक्षा प्रमुख मा. श्री. संजयजी कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. श्री. सुरेशजी (नानासाहेब) जाधव , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव प्रकल्प अधिकारी मा. श्री. गणेश इवनाते, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी देव, उपकार्याध्यक्ष मा. श्री. डॉ. आनंदजी लेले, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री. धनंजयजी वाडेकर व्यवस्थापक मंडळाच्या सदस्य मा. श्रीमती सीमाताई कांबळे व मा. श्रीमती उमाताई जोशी, विमल ट्रस्ट चे श्री. विलास कात्रे साहेब, शाळा समिती सदस्य मा. श्री विक्रमशेठ बाफना व मा.श्री.युवराज शिंदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रदीप वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनिता देवरे यांच्या हस्ते बहुउद्देशीय सभागृह ,भोजन कक्ष ,सुसज्ज ग्रंथालय अत्याधुनिक संगणक कक्ष आणि बाया कर्वे व्यवसाय प्रशिक्षण कक्ष यांचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमास कामशेत पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व कामशेत येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी आश्रमगीताचे सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाला समितीचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक मा. श्री. धनंजयजी वाडेकर यांनी केले .कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत समारंभ मुख्याध्यापक मा. श्री. प्रदीप वाजे यांनी संपन्न केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून आदिवासी गीतांच्या माध्यमातून आदिवासी जनजाती संस्कृतीचे दर्शन घडवत सर्व उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील इयत्ता दहावीची काजल दाते या विद्यार्थीनीने आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या. प्रांत संघचालक मा.श्री.नानासाहेब जाधव यांनी सर्वांना मार्गदर्शन करतांना शाळेचे कौतुक केले तसेच सर्व समाजात समतेविषयी विचार व्यक्त केलेले. विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास दिला. अखिल भारतीय जनजाती हितरक्षा प्रमुख मा. श्री. संजयजी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शाळेचा प्रवास, विद्यार्थ्यांची प्रगती उंचावत जाण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच जनजाती हितरक्षा प्रमुख म्हणून काम करत असतांना आलेल्या सकारात्मक अनुभवाचा उल्लेख त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केला.

सर्व जनजाती समाजातील विद्यार्थ्यांना नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी देव यांनी अध्यक्षीय मनोगतात शाळेचे अनोखे स्नेहसंमेलन, मातृहस्ते भोजन ,किल्ले स्पर्धा, नवरात्रोत्सव अशा विविध उपक्रमाचे कौतुक केलं. विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमने झाली. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनिता देवरे यांनी मांनले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री अजित डुंबरे यांच्यासह विद्यार्थिनी शुभांगी हेमाडे आणि हिंदवी लोहार यांनी केले.