प्रवेशोत्सव २०२६-२७

प्रवेशोत्सव २०२६-२७

आश्रमशाळा, कामशेत    08-Oct-2026
Total Views |
महर्षी कर्वे आश्रम शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
 
प्रवेशुत्सव
 
. कार्यक्रमाची सांगता पसायदाने झाली. कार्यक्रमाचे आभार गुजर मॅडम यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुकाराम पवार यांनी केले.कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये आज सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी ११.०० वाजता शाळेच्या सभागृहामध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. इयत्ता पहिलीच्या वर्गातील नवागतांचे स्वागत करणे हे या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेने कामशेत नगरामध्ये ढोल ,ताशांच्या गजरामध्ये आज प्रभात फेरी काढली होती .पहिलीच्या सर्व नवागतांचे औक्षण शाळेतील शिक्षिका पाठक मॅडम ,कांबळे मॅडम ,गुजर मॅडम, राक्षे मॅडम, काजळे मॅडम यांनी केले .
 
प्रवेशुत्सव
   कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना गुलाब पुष्प तसेच खजूर चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक आश्रमगीताने झाली. घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी मा.आप्पासाहेब जाधव सर , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. प्रदीप वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनिता देवरे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे परिचय शाळेतील शिक्षक श्री. संजय हांडे सर यांनी करून दिला. आज शाळेत इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावी पर्यंत उपस्थित असणारे विद्यार्थी यांचेही पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
 
प्रवेशुत्सव
        सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित पालकांना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा.श्री.वाजे सर मार्गदर्शन केले तसेच या शाळेतून सर्व विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होतील असे आश्वासन पालकांना दिले. जाधव सर यांनी शाळेचे कौतुक केले तसेच बोधात्मक गोष्टी सांगून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगले गुण मिळवावेत असे आवाहन केले. त्याचबरोबर इयत्ता दहावी बोर्डामध्ये पहिले पाच आलेल्या विद्यार्थिनी माधुरी राक्षे, निकिता निसाळ, निकिता बुरुड ,समीक्षा वाजे, स्नेहल वासावे या गुणवंत विद्यार्थिनींचे स्वागत व बक्षीस वितरण देखील पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील माजी विद्यार्थिनी ही महिलाश्रम हायस्कूल पुणे येथे बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या अंकिता निसाळ हिचेही अभिनंदन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रवेशुत्सव