महर्षी कर्वे आश्रमशाळेत शबरी माता मातृहस्ते भोजनाचा एक अनोखा कार्यक्रम संपन्न...
कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेमध्ये माता शबरीमाता मातृहस्ते भोजनाचा एक अनोखा कार्यक्रम आज शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी ७.०० वाजता श्रीराम नवमी पावन पर्व व भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात शाळेच्या मैदानावर संपन्न झाला.
शाळेत शिक्षण घेत असलेल्या जनजाती समाजातील 380 विद्यार्थी-विद्यार्थीनी व त्यांच्यासोबत जोडलेली 175 कुटुंब असं अनोखं दृश्य यावेळी पाहायला मिळालं. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, वेळ व्यवस्थापन, संयोजन व समन्वयातून अतिशय अप्रतिम आगळावेगळा उपक्रम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण
संस्थेच्या आश्रमशाळेच्या प्रांगणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख श्री. अतुलजी अग्निहोत्री, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष मा. श्री आनंदजी लेले, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री धनंजय वाडेकर,महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका मा. श्रीम. उमाताई जोशी, माध्यमिक मुख्याध्यापक श्री प्रदीप वाजे सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीम.अनिता देवरे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध क्षेत्र, संस्था-संघटनांचे पदाधिकारी, विशेष निमंत्रित कुटुंब आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
"मैं तू एक रक्त" या उक्तीनुसार समाजातील विविध घटक जनजाती समाजाशी जोडले जावेत व राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येऊन सर्वांनी देशासाठी काहीतरी योगदान द्यावं या प्रमुख हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
_202610081243424201_H@@IGHT_500_W@@IDTH_1500.jpeg)
यावेळी वाजे सरांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मातृहस्ते भोजन ही संकल्पना व आश्रमशाळेची सविस्तर सर्व माहिती दिली. कार्यकाचे प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री .तुकाराम पवार केले. मा. श्री अतुलजी अग्निहोत्री यांनी आपल्या मनोगतात आश्रमशाळेच्या कार्याचे कौतुक करताना उपस्थित सर्व कुटुंबांना धन्यवाद दिले. सामाजिक जाणीव ठेऊन आपली कुटुंबव्यवस्था राष्ट्र घडवणारी पिढी घडवते हे त्यांनी सांगितले. आपले कुळाचार, परंपरा, संस्कार पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव सर्व उपस्थितांना करून दिली. कुटुंबप्रबोधन या कामाची आवश्यकता सांगताना त्यांनी आपल्या उज्ज्वल इतिहास व वारसा जपण्याचं आवाहन सर्वांना केले. अध्यक्षीय भाषणात मा. श्री. आनंद लेले सरांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रीमती देवरे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थी -कुटुंब जोडणी झाल्यावर भोजन मंत्र घेऊन सर्वांनी विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करत भोजन समारंभ संपन्न केला. अनेकांनी या कार्यक्रमाविषयीचे आपले अभिप्राय देताना या उपक्रमाचे कौतुक केले. गेले महिनाभर संपर्क व नियोजन करत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित डुंबरे यांनी केले.