आदिवासी दिन

आदिवासी दिन

आश्रमशाळा, कामशेत    08-Oct-2026
Total Views |
आश्रमशाळेत आदिवासी दिन, क्रांती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
 
क्रांतीकारक दिन
 
      कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत वार रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026रोजी सकाळी ठीक 9.30वाजता शाळेच्या सभागृहामध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाची सुरुवात महर्षी कर्वे ,बाया कर्वे ,भारत माता ,भगवान बिरसा मुंडा , राघोजी भांगरे, हुतात्मा नाग्या कातकरी आणि क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप्रज्वलन शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती अनिता देवरे, संवेदना फाउंडेशनचे लोणावळा अध्यक्षा सन्मानिय श्रीम. सोनालीताई शेळके व कोशाध्यक्ष मा. श्री. रवी शेळके, ज्येष्ठ शिक्षक गोकुळ खैरनार ,राजेंद्र जगताप, संजय हांडे यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक, ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
क्रांतीकारक दिन
      कार्यक्रमाची सुरुवात गावातून वाद्यवृंदाच्या निनादात जनजाती दर्शन प्रभातफेरी काढण्यात आली होती. श्री .तुकाराम पवार यांनी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाविषयी माहिती सांगितली.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. देवरे मॅडम यांनी 1942 रोजी महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात मुंबईच्या क्रांती मैदानावर भारत छोडो चळवळ सुरू केली. संवेदना फाउंडेशन लोणावळा च्या वतीने शाळेत लागवडीसाठी काही वृक्ष भेट दिले.त्यानंतर आदिवासी दिनानिमित्त नृत्य स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. स्पर्धेला परीक्षक म्हणून श्रीमती कांबळे मॅडम, श्रीमती पाठक मॅडम व खैरनार सर यांनी काम पाहिले. स्पर्धेचा निकाल श्री अजित डुंबरे यांनी घोषित केला. त्यामध्ये इयत्ता तिसरी , इयत्ता सातवी,इयत्ता सहावी, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गट विजयी झाले.

क्रांतीकारक दिन 
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली. कार्यक्रमाचे आभार श्री दत्तात्रय माने यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर देशपांडे यांनी केले.