लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती.
_202610081140144663_H@@IGHT_500_W@@IDTH_1200.jpeg)
महर्षी कर्वे आश्रमशाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत आज शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.30वाजता शाळेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कामशेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. आकाश पवारसाहेब, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री दत्ता शेडगेसाहेब , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवरे मॅडम , शिक्षिका श्रीमती पाठक मॅडम , श्री.माने सर, श्री.खैरनार सर ,श्री.जगताप सर यांच्या हस्ते भारतमाता, महर्षी कर्वे, बाया कर्वे, लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच ,शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये हांडे सर, डुंबरे सर,कांबळे मॅडम परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्र. सलोनी मोरमारे,द्वितीय क्र.रोहित मोरमारे, आदिती शिंदे,तृतीय क्र. भाग्यश्री मोरमारे तसेच लहान गटात प्रथम क्र. जान्हवी मदगे द्वितीय क्र.विशाखा निग्वाले, समृद्धी उगले तृतीय क्र.लावण्या ठोंबरे, हे विद्यार्थी स्पर्धेत विजयी ठरले विजेत्या सर्व स्पर्धकांना श्री. पवारसाहेब व श्री.शेडगेसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पवारसाहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायबर गुन्हे व अभ्यासाविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. काजल दातेंनी मनोगते व्यक्त केली शाळेच्या मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुण्यतिथी व जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेडगेसाहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे आभार देशपांडे सर यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. तुकाराम पवार यांनी केले..