80वा स्वातंत्र्यदिन

80वा स्वातंत्र्यदिन

आश्रमशाळा, कामशेत    08-Oct-2026
Total Views |
80वा स्वातंत्र्यदिन सोहळा आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात संपन्न.
 
 
15 ऑगस्ट
        कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन सोहळा आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8.15 वाजता शाळेच्या मैदानावर स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाजप शहर अध्यक्ष तळेगाव दाभाडेव बालपणापासून राष्ट्रीय स्वयम संघाचे स्वयंसेवक मा. श्री. रविंद्रजी आप्पा भेगडे टेकावडे, डॉ. मा. श्री.आदिनाथ नागरे ,डॉ.श्रीम.प्रियंका नागरे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थचे व्यवस्थापन समिती सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री धनंजयजी वाडेकर , शाला समितीचे सदस्य व युवा उद्योजक मा. श्री. युवराज शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. शंकरनाना शिंदे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रदीपजी वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे मा. श्री. रवींद्र जी आप्पा भेगडे व मा. श्री. आदिनाथ नागरे यांच्या हस्ते ध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व कामशेत येथील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांनी केले .कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय शाळेतील शिक्षक मा. श्री. अजित डुंबरे यांनी करून दितसेच धनश्री करवंदे ,साक्षी चौधरी, जयश्री सांबरी , शुभांगी हेमाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे मा. श्री. रविंद्रजी आप्पा भेगडे यांनी सर्व प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजाचा अर्थ, आपण सातशे वर्ष गुलामगिरी मध्ये कशाप्रकारे होतो हे त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले तसेच आपण शिकून आपल्या आई वडिलांचे नाव व देशाचे नाव मोठे केले पाहिजे.प्रमुख पाहुणे मा. श्री. आदिनाथ नागरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत देखील करण्यात आले. 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये ध्वज फडकवण्यात आला. हर घर तिरंगा या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री तुकाराम पवार यांनी केले.