नवरात्र उत्सव व रावणदहन
कामशेतच्या आश्रमशाळेत जनजातीय मातृशक्तीचा जागर करत देशविरोधी शक्तीरूपातील रावणाचे दहन करून नवरात्र उत्सव संपन्न
कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेमध्ये आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी जनजातीय मातृशक्तीचा जागर करत देश विरोधी शक्ती रूपातील रावणाचे दहन नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.ॲड. वर्षाताई चंद्रकांत डहाळे, उपाध्यक्ष भाजप महिला आघाडी पुणे जिल्हा मा. श्रीमती ज्योतीताई सुरेश जाधव ,शाला समितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती सीमाताई कांबळे ,शाला समिती सदस्य मा. श्री धनंजय वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजकमा. श्री. नवनाथजी ठाकर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री.प्रदीपजी वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांच्या हस्ते झाले व महारती देखील त्यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पंढरीनाथ वाडेकर यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचा परिचय श्री. राजेंद्र जगताप यांनी करून दिला. जनजाती गौरव दिन व नवरात्र उत्सव याचे औचित्य साधून शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत शालेय नित्य वेळापत्रकात कुठलाही व्यत्यय न आणता रोज दोन वेळा महाआरती घेण्यात आली. समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मातृशक्तींचा यावेळी बाया कर्वे नारीशक्ती सन्मानाने गौरव करण्यात आला. संपूर्ण उत्सवात विद्यार्थी विद्यार्थिनींनी नवदुर्गा स्तोत्र, श्री सूक्तम, मंगळागौर नृत्य, देवीचा गोंधळ, पारंपारीक आदिवासी वेशभूषा, गीते, जनजातीतील महिला क्रांतिकारक यांच्या जीवनावर आधारित प्रसंग नाटिका असे विविध कार्यक्रम उपस्थित मान्यवर महिला व विद्यार्थ्यांसमोर सादर केले .
प्रथम दिवस
शैलपुत्री देवी व सफेद रंगाची माहिती विद्यार्थीनींनी सांगितली. आदिवासी जनजातीचा गौरव म्हणून मा. राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा जीवनपट पायल बगाड हिने उलगडला. मा. शिल्पा रोडगे (प्रशासनाधिकारी तळेगाव दाभाडे) यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात परीस्थितीवर मात करून उंच भरारी कशी घ्यायची यावर मार्गदर्शन केले.

दुसरा दिवस -
ब्रह्मचारिणी या देवी विषयी माहिती व वेशभूषा छकुली हांडे या विद्यार्थिनीने केली. गायत्री बांगारे हिने लाल रंगा विषयीची धार्मिक, नैसर्गिक व सामाजिक शिष्टाचारासंबंधीची माहिती सांगितली. राणी दुर्गावती यांच्या विषयीची माहिती गौरी हेमाडे हिने सांगितली. दुर्गा स्तोत्र व पसायदान झाले. इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या प्रेसिडेंट मा. रश्मीताई थोरात यांचे मार्गदर्शन झाले. विद्यार्थी विद्यार्थिनींशी गप्पा मारत सकारात्मकता व देशप्रेम तसेच शिकण्याचा उपयोग समाजासाठी आरोग्यासाठी कसा करावा हे सांगितले.पंच परिवर्तनातील पर्यावरण जागृती या विषयावर नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली वृक्षाचे मनोगत कविता सादर करून भावनिक साद घातली.
तिसरा दिवस-
चंद्रघंटा देवी आणि निळ्या रंगाविषयी माहिती आकांक्षा शेळके हिने सांगितली. देवीची वेशभूषा राधिका निग्वालेने साकारली. महाआरती मा. मयुरीताई बोत्रे ( दिव्यांग फाउंडेशन संस्था लोणावळा) यांच्या हस्ते झाली. त्यानंतर जनजाती क्रांतिकारक शिमगी दई विषयी माहिती साक्षी चौधरी हिने सांगितली. मयुरी ताई बोत्रे यांनी त्यांचा दिव्यांग शरीरावर मात करून विविध क्षेत्रात कसे कार्य केले. याविषयी सविस्तर माहिती दिली. व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. अभ्यासात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात प्रोत्साहन दिले.
दिवस चौथा -
देवी कुष्मांडा आणि पिवळ्या रंगाची माहिती शुभांगी हेमाडे तिने सांगितली.व देवीची वेशभूषा जयश्री सांबरी हिने साकारली. महाआरती सौ शिल्पा ताई कुडेकर( दिव्यांग कार्यकर्त्या) व सौ. शालिनीताई झगडे ( योग शिक्षिका) यांच्या हस्ते घेण्यात आली.
त्यानंतर आदिवासी क्रांतिकारक फुलो आणि झानो मुर्मू यांच्या जीवनावरील नाटिका सादर केली.
सर्वांनी योगसाधना करावी व रोगांपासून मुक्त व्हावे. आरोग्य धनसंपदा मिळवावी असे सांगितले.
दिवस पाचवा-
स्कंदमाता देवीची वेशभूषा व स्कंदमातेची माहिती अस्मिता पावशे तिने सांगितली. हिरव्या रंगा विषयी माहिती समृद्धी दाते हिने सांगितली. महाआरती सौ. ममता राठोड ( उपमुख्याधिकारी नगरपरिषद, तळेगाव)* यांच्या हस्ते घेण्यात आली. महिला क्रांतिकारी वीरांगणा लिपा विषय माहिती पूजा ठाकर हिने सांगितली
सौ. ममता राठोड ताईंनी त्यांच्या मार्गदर्शनात शिक्षणापासून तर अधिकारी होईपर्यंतचा प्रवास कसा झाला याची संघर्षगाथा मांडली. जीवनात शिक्षणाला महत्व ओळखून सर्वानी शिकून आई-वडिल, शिक्षक, शाळा व देशाचे नाव मोठे करतील असा विश्वास दिला.
दिवस सहावा-

कात्यायनी देवीची वेशभूषा व माहिती वर्षा गावडे हिने सांगितली. राखाडी रंगाची
धार्मिक- वैज्ञानिक महत्त्व पल्लवी मेंगाळने सांगितले. पारंपरिक पद्धतीने भोंडला कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी इयत्ता 9 व 10वी च्या मुलींसाठी कळी उमलतांना या प्रकल्पा अंतर्गत वैद्य ज्योतीताई नागराज मुंडर्गी, डॉ. वैभवीताई कोराट, डॉ. उज्ज्वलताई भेगडे, डॉ. अपूर्वाताई मुंडर्गी यांनी व्याख्यान दिले. मेघा निसाळ हिने राणी रोपुइलिया महिला क्रांतिकारी वीरांगनेविषयी माहिती सांगितली.
वैद्य ज्योतीताई नागराज मुंडर्गी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्त्री आरोग्याचे महत्त्व, भगवान धन्वंतरी यांच्या विषयी माहिती ,जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताचा गौरव , देशी गाईचे दूध ,दही ,तूप व गोमूत्र या
चा आजारावर उपयोग व महत्त्व, आहारातील भाज्यांचे महत्त्व या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.
दिवस सातवा
कालरात्री मातेची वेशभूषा व माहिती गायत्री बांगारे हिने सांगितली. केशरी रंगाविषयी काजल दाते हिने सांगितले.
सौ अनघा ताई बुरसे आणि ज्योतीताई राजीवडे यांच्या हस्ते सायंकाळची महाआरती
झाली. अनघा ताईंनी एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना खूप हसवले.
दिवस आठवा-
महागौरी देवी व मोरपंखी* रंगा विषयी माहिती प्रियंका वासावे हिने सांगितले. वीरांगणा झलकारी बाईंची माहिती कोमल गावडे हिने सांगितली. सुपर वुमन अवार्ड विजेत्या सौ.राजश्री कौस्तुभ कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी आपल्या मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी जनजातीचा गुणगौरव केला. मी एक आई आहे .आई जसे बाळाचे संगोपन करते. तशी भारत माता आपली सर्वांची काळजी घेत असते. तिचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे . मोहामुळे मनुष्य आंधळा झाला आहे. काळ बदलत आहे. सतत विवेकबुद्धी जागे ठेवणे. मुलींना समाजकार्यासाठी प्रोत्साहित केले.
नववा दिवस -

सिद्धदात्री मातेची माहिती व आजच्या जांभळ्या रंगाची माहिती विद्यार्थीनींनी सांगितली. महाआरती शाळेतील शिक्षकांच्या सौभाग्यवती तसेच मातृशक्ती जागृती व गडकोट दक्षता समिती, महाराष्ट्र सरकार च्या सदस्या Adv.वर्षाताई डहाळे यांच्या हस्ते झाली. आपण जर इतिहासाला विसरलो तर इतिहास पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो व महिला कधीच अबला नव्हत्या त्यांनी न्यूनगंड काढून टाकून नव्या युगातील आव्हानाना तोंड देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. योग्य वैचारिक बैठक ठेवून राष्ट्र उभारणीच्या कामात अग्रेसर व्हायला काय करायला हवं हे सांगितले.
देश विरोधी शक्तीरूपातील रावण दहन करून या नवरात्र उत्सवाची सांगता झाली. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी ज्या गोष्टींचा अडसर ठरत आहे त्यांची प्रतीकात्मक दहातोंडे असलेला रावण आश्रमशाळेने बनवला होता. वृक्षतोड, प्रदूषण, बेशिस्त वाहतूक, अस्वच्छता, अस्पृश्यता, जातीभेद, विभक्त कुटुंब पद्धती, विदेशी वस्तू, पाश्चात्य बिभत्स संस्कृती अशा दहा तोंडांचा रावण दहन करताना सर्व उपस्थित नागरिक, विद्यार्थी यांना या समस्यांचे गांभीर्य लक्षात येत होते. त्यावर निश्चितपणे मात करण्याचा संकल्प सर्वांनी केला.
कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमनी झाली .कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे आभार श्री गोकुळ खैरनार यांनी मांनले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कांबळे मॅडम यांनी केले.
भारत माता की जय दुर्गा माता की जय