महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व अभंग स्पर्धेचे आयोजन.

महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व अभंग स्पर्धेचे आयोजन.

आश्रमशाळा, कामशेत    08-Oct-2026
Total Views |
महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व अभंग स्पर्धेचे आयोजन.
 
आषाडी एकादशी
कामशेत शहरातील महर्षी कर्वे आश्रमशाळेमध्ये आज शुक्रवार दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती, परंपरेची ओळख व त्यांच्यामध्ये भक्तीभाव जागृत व्हावा यासाठी शाळेपासून ते कामशेत  श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत दिंडी - रिंगण सोहळा व अभंग स्पर्धांचे आयोजन करून आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात आश्रमशाळेमध्ये पालखी तसेच विठ्ठल, रुक्मिणी  व ज्ञानेश्वर महाराजांचे प्रतिमापूजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे  तसेच श्री श्रीकांत बुरांडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,  विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती.  विठ्ठलाची वेशभूषा समोर गावडे तर रुक्मिणीची वेशभूषा पुजा ठाकर या विद्यार्थिनीने  केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्री.तुकाराम पवार यांनी केले तर श्री  दत्तात्रय माने यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, धार्मिक  महत्त्व,  संतांचे विचार आणि सामाजिक संदेश समजावून सांगितला. ज्येष्ठ शिक्षिका पाठक मॅडम यांनी वारीमागील विज्ञान विद्यार्थ्यांना पटवून दिले.  शिक्षक श्री. गोकुळ खैरनार ,पद्मिनी कांबळे   व अजित डुंबरे ,अर्जुन ढेरे,देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे प्रस्थान  टाळ मृदुंगाच्या गजरात करण्यात आले. सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. दिंडीचे स्वागत गावामध्ये ठिकठिकाणी पुष्पवृष्टी,पालखी पूजन व दर्शनाने मोठ्या उत्साहात करण्यात आले. गावामध्ये  चिमुकल्या वारकऱ्यांनी भक्ती गीते, गवळणी ,अभंग आणि  विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठे रिंगण घातले. या दिंडीच्या निमित्ताने समाजामध्ये भ्रष्टाचार ,वृक्षारोपण ,मुलींचे शिक्षण ,
 
दिंडी

 पर्यावरण रक्षण आणि पाणी बचतीचा संदेश देणारी पत्रके विद्यार्थ्यांनी वाटून जनजागृतीचेही कार्य केले. अभंग स्पर्धेत इयत्ता 4वी ते इयत्ता 10वी हे वर्ग सहभागी झाले . जगताप सर, पवार सर, हांडे सर, देशपांडे सर, गुजर मॅडम, खैरनार सर ,काजळे मॅडम, गायकवाड मॅडम यांनी अभंग तयारी करून घेतली. परीक्षक म्हणून पाठक मॅडम, किशोर पारधी, बुरांडे सर,  यांनी काम पाहिले. चित्रीकरण अमर कसबे केले. 
कार्यक्रमाची सांगता शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत आरती व पसायदानाने झाली. नंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाचे आभार समन्व्यक श्री दत्ताराम जाधव सर यांनी व सूत्रसंचालन श्री.राजेंद्र जगताप सर यांनी केले.