प्रेरणा आणि सक्षमीकरण साधणारा परिसर...
महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत, येथे शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, एका पोषक आणि गतिमान वातावरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जातो. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त परिसरात वसलेल्या या शाळेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रशस्त क्रीडांगणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस पूरक अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
🖥️ द्रौपदी जी मुर्मू- संगणक कक्ष. आमच्या शाळेतील आधुनिक व सुसज्ज संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला आणि तंत्रज्ञानाधारित कौशल्य विकासाला सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रशस्त, स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरणात विद्यार्थ्यांना संगणकाचा प्रत्यक्ष वापर करून शिकण्याची प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था उपलब्ध असून, Computer Education, MS Office, Typing, Digital Learning, Internet-based Learning,HTML, C Language, AI-Tools, Canva, Scrasch Programming आणि विविध Practical Activities यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला कृतीची जोड दिली जाते.
📚 बहिरजी नाईक दालन-शालेय ग्रंथालय.
आमच्या शाळेतील “बहिरजी नाईक दालन” हे विद्यार्थ्यांच्या
ज्ञानवृद्धी, वाचनसंस्कृती आणि स्व-अध्ययनाला प्रोत्साहन देणारे
एक समृद्ध व प्रेरणादायी शैक्षणिक केंद्र आहे. विद्यार्थ्यांना शांत,
प्रसन्न आणि वाचनास पोषक वातावरण मिळावे यासाठी ग्रंथालयाची
सुंदर व शिस्तबद्ध मांडणी करण्यात आली आहे.
ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील पाठ्यपूरक पुस्तके, संदर्भग्रंथ,
कथा-कादंबऱ्या, बालसाहित्य, ज्ञानवर्धक साहित्य व नियतकालिके
उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार
पुस्तके निवडून वाचण्याची तसेच नियमित वाचनाची सवय विकसित
करण्याची संधी येथे मिळते.